सामाजिक बांधिलकी जपणारे दत्तात्रय गोसावी

सामाजिक बांधिलकी जपणारे दत्तात्रय गोसावी
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क :
समाज सेवा करणारे व्यक्तीमत्व हे म्हणजे त्या व्यक्तीची स्वार्थनिर्मित्या प्रवृत्ती नसलेली आणि सामाजिक सेवेच्या उद्दिष्टाने कृती करणारी व्यक्ती म्हणून ओळख निर्माण केलेले व्यक्तिमत्व म्हणजे दत्तात्रय गोसावी यांचे नाव घेतले जाते.
समाज सेवा करत असताना विशेषता प्रमुखतेना खर्च करणारे आणि समाजासाठी कार्य करणारे आदर्श आहेत. ह्या व्यक्ती स्वयंसेवा, सामाजिक संस्थेसाठी, समाज सेवा आपल्या हातून घडावी, आणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या उद्देशाने दत्ताभाऊ गोसावी यांनी समाजातील दुःखी, असहाय किंवा पीडित लोकांसाठी आपल्या सामर्थ्यानुसार मदत करावी या भावनेने विखे पाटील येथील रुग्णालयात खजूर वाटप करण्यात आली.
श्री. दत्तात्रय रामचंद्र गोसावी सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी यांचा नुकताच झालेल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून श्री. दत्तात्रय गोसावी यांनी सिंधुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल चिंचोली सिन्नर येथील ७० ते ८० रुग्णांना खजूर पॉकिटांचे वाटप करण्यात आले. तसेच तेथील रुग्णांवरती उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. वैभव खर्डे, वनिता सानप, डॉ. आशिष शिंदे ( स्त्रीरोग तज्ञ) डॉ. राजकुमार राठोड, डॉ. गिरीश पाटील, डॉ. योगेश बोरसे, श्री. दत्ता जोशी, श्री. भाऊसाहेब ढेंगळे, रोहन भावसार, सागर गोसावी, सार्थक गोसावी, यावेळी उपस्थित होते.