श्रीलेखा पतसंस्थेचा वर्धापनदिन व वार्षिक सभा संपन्न

श्रीलेखा पतसंस्थेचा वर्धापनदिन व वार्षिक सभा संपन्न
गुरु न्युज नेटवर्क | सिन्नर | येथील श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्थेचा कारभार व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असून, तो वाखण्याजोगा असल्याचे मत सिन्नर सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी व्यक्त केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व वर्धापनदिन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रा. जयंत महाजन होते.
यावेळी व्यासपीठावर संजय गिते, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अरुणशेठ वारुंगसे, माऊली पतसंस्थेचे चेअरमन डॉ. रमेश जगताप, सिन्नर व्यापारी बँकेचे व्यवस्थापक दिपक हांडे उपस्थित होते. श्री गीते म्हणाले की, संस्थेतील कर्मचारी व संचालक मंडळ निस्पृह व कार्यक्षम असेल तर संस्था पुढे जात असते. श्रीलेखा पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असल्यामुळे तिचा नावलौकिक वाढला आहे. गेल्या वीस वर्षांपासून या संस्थेने ‘अ’ वर्ग कायम ठेवला. याशिवाय अल्पावधीतच स्वतःची इमारत उभी केली. त्याचे श्रेय नक्कीच संचालक
व कर्मचाऱ्यांना द्यावे लागेल. सर्वच संस्थांनी असाच पारदर्शक कारभार करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा. जयंत महाजन म्हणाले की, सहकार क्षेत्रात मध्यंतरी अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु गेल्या काही वर्षांपासून सहकारातील नियमात
झालेल्या बदलामुळे संस्था सक्षम व बळकट झाल्या आहेत. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक कांताराम माळी, संचालक सोपान पडवळ, विलास पवार, नारायण पवार, सभासद महेश कुटे, राजेंद्र घोलप, वसुली अधिकारी राजाराम उगले यांनी सर्वसाधारण सभेतील विषयातील
ठरावावर चर्चात्मक स्पष्टीकरण दिले. यावेळी सर्वश्री नारायणशेठ वाजे, राजेंद्र चव्हाणके, सहकार अधिकारी नवनाथ गडाख, नामदेव लोंढे, दिपक लोंढे, नामदेव लोणारे, रमेश माळी, नामदेव जाधव, कैलास म्हस्के, नितीन खरणार, सुदर्शन जेडगुले, कुणाल चांदोरे, सचिन घोरपडे, संदेश देशमुख, योगेश देशमुख, भालचंद्र जाधव, भगवान माळी, रवींद्र येवले, दिनेश खेडलेकर, मंदार दामले,
बाळकृष्ण पवार, सदाशिव आघाने, प्रवीण हांडोरे, श्रीकांत पाटील, करण गुजराती, मनीष गुजराती, यश पवार, विकी गुजर, रामनाथ पवार, डॉ. राजेंद्र कमानकर, राजेश कपूर, अतुल कासट, सोपान एलके, किरण गायकवाड, सुकदेव काळोखे, संतोष ढमाले, संकेत माळी, नामदेव सोनवणे, काशिनाथ शिंदे, नारायण शिंदे, सोमनाथ नाठे, सूर्यभान पवार, सुधीर जगताप, अंबादास थेटे, राहुल गायकवाड, कैलास वाकचौरे, रामदास बोडके, मयूर सोनवणे, वसंत शिंदे, नंदू शिंदे, अनिकेत कलंत्री, शिल्पा गुजराती, शांता पवार, सीमा महाजन,
संगीता पवार, कल्पना शिंदे, ऋतुजा पवार, सविता माळी, कविता पवार, छाया पवार, सुचित्रा तांबे, सानिका माळी आदी उपस्थित होते. कांताराम माळी यांनी सूत्रसंचालन केले. नारायण पवार यांनी आभार मानले.