सिन्नरमध्ये आयुष्यमान भारत कार्ड नोंदनी व फ्री मेडिकल चेकअप शिबिर

सिन्नरमध्ये आयुष्यमान भारत कार्ड नोंदनी व फ्री मेडिकल चेकअप शिबिर
गुरु न्यूज नेटवर्क | सिन्नर : www.gurunews.co.in
सिन्नरमध्ये श्रमिक कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदनी व वितरण करण्यात येणार असून, फ्री मेडिकल चेकअप दिनांक 03 ऑगस्ट २०२५ रविवार रोजी दुपारी ०१ ते ०६ वाजे पर्यंत. नर्मदा लॉन्स, श्री. भैरवनाथ मंदिरा शेजारी सिन्नर येथे संपन्न होणार आहे.
सिन्नर तालुक्यातील सर्व पुरोहित अर्चक, गुरव व हरीभक्ति परायण यांना कळविण्यात आनंद होत आहे की, मंदीर अर्चक पुरोहित आयाम, विश्व हिंदू परिषद, अर्चक पुरोहित सेवा शिबिर आयोजित करत आहे.
सर्व अर्चक व पुरोहितांना विनंती आहे की, या शिबिरात भाग घेऊन फ्री मेडिकल चेकअप व श्रमिक कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड साठी नोंदणी करावी. व भविष्यात सर्व सरकारी योजनांचा आणि सरकारी मेडिकल इन्शुरन्स, रु.5 लाख, चा लाभ मिळवावा.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी, कृपया स्वतःचे आधारकार्ड व बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरोक्स, सोबत आणणे गरजेचे असून, त्यासाठी नोंदणी शुल्क रु. ७५ फक्त आकारणी करण्यात येणार आहे.
सर्व अर्चक व पुरोहित बंधुंना विनंती आहे की, शिबिर स्थानावर वेळेवर उपस्थित राहण्याची कृपा करावी. असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नासिक ग्रामीण अध्यक्ष श्री. बाळासाहेब देशपांडे, वेदमूर्ती पंकज उंदिरवाडकर (सहप्रमुख ), मंदिर अर्चक पुरोहित आयाम, नाशिक. यांनी केले आहे.