“सावित्रीबाई” चा अपमान करणारे विकृत लिखाण

“सावित्रीबाई” चा अपमान करणारे विकृत लिखाण
सिन्नर | ३१ मे २०२३, गुरू न्युज नेटवर्क : –
“इंडिक टेल्स & हिंदू पोस्ट” या वेबसाईटने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर लिखाण केले आहे, या वेवसाईट वर बंदी घालून लेखकावर गुन्हा दाखल करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगझाप यांनी पोलीस स्टेशन सिन्नर येथे देण्यात आले.
यावेळी तालूका अध्यक्ष राजेंद्र जगझाप, शहर अध्यक्ष विशाल चव्हाण, राजेंद्र भगत, राजाराम मुरुकुटे, पांडुरंग वारूगसे, प्रा. राजाराम मुंगसे, मा. नगरसेवक किरण कोथमिरे, उदय गोळेसर, प्रवीण जगताप, विलास दराडे, रामचंद्र नरोटे, लक्ष्मण बर्गे, रवींद्र मोगल, भाऊसाहेब् पवार, दिलीप वेळजाली, वैभव गायकवाड, भगीरथ माळी, संतोष पवार, विलास माळी, साहेबराव माळी, चंद्रकांत माळी, राजेंद्र सोनवणे, अक्षय गाडेकर, सचिन मिठे, प्रदीप दगळे, आशिष फुळसुंदर, दर्शन जेजुरकर, भारत जेजुरकर, रोशन लोंढे, महिला तालुकाध्यक्षा मेघाताई दराडे, रुबीना सैय्यद, अनिता खैरनार, माया घोडेराव, मच्च्छिन्द्र पवार, राजेंद्र माळी, निवृत्ती पवार, विकास पवार आदी उपस्थित होते