रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी अॅड. भगीरथ शिंदे यांची तिसऱ्यांदा निवड

रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी अॅड. भगीरथ शिंदे यांची तिसऱ्यांदा निवड
सिन्नर | २७ मे २०२३, गुरू न्यूज नेटवर्क :
देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र अॅड. भगीरथ शिंदे यांची संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांनी तिसऱ्यांदा फेरनिवड केली.
देशातील सर्वात जास्त महाविद्यालये, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, इंजीनियरिंग व इतर ७३९ शाखा असलेल्या व साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या नव्याने निवडून आलेल्या मॅनेजिंग कौन्सिलची पहिली बैठक पुणे येथे पार पडली असून, सदर निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत मध्ये बऱ्यापैकी बदल करण्यात आले असून, नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यात अपवाद फक्त अॅड. भगीरथ शिंदे यांचा झाला. ॲड. भगीरथ शिंदे यांची प्रशासनावर असलेली पकड, संस्थेत त्यांनी सुरू केलेले नवीन शैक्षणिक उपक्रम व त्यातून प्रत्येक शाखा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ते करीत असलेले प्रामाणिक प्रयत्न यांची दखल मा. खासदार शरचंद्रजी पवार यांनी घेत पुन्हा एकदा व्हाइस चेअरमन पदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपवली आहे.
संस्थेचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत मध्ये बऱ्यापैकी बदल करण्यात आले, आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, त्यात अपवाद फक्त अॅड. शिंदे यांचा झाला. ॲड. भगीरथ शिंदे यांची प्रशासनावर असलेली पकड, संस्थेत त्यांनी सुरू केलेले नवीन शैक्षणिक उपक्रम व त्यातून प्रत्येक शाखा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न यांची दखल मा. खासदार पवार यांनी घेत पुन्हा एकदा व्हाइस चेअरमन पदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपवली आहे. तसेच श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन प्रा. जयंत महाजन, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन मा. नारायणशेठ वाजे, मा. नगरसेवक हेमंतनाना वाजे, राजेश कपूर, नामदेव कोतवाल, श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था व्यवस्थापक कांताराम माळी, डॉ. रमेश जगताप, डॉ. डी. एम. गडाख, अरुनशेठ वारूनगसे यांनी या सार्थ निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना गुरू न्यूज नेटवर्क ग्रुप कडून अभिनंदन व पुडील वाटचालीस शुभेच्छा!