मराठा विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण
आयडीयल सेंटरचा स्तुत्य उपक्रम

मराठा विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण
आयडीयल सेंटरचा स्तुत्य उपक्रम
गुरू न्यूज नेटवर्क : दि. ०३ नोव्हेंबर २०२३
सिन्नर येथील आयडियल कॉम्प्युटर्सच्या वतीने मराठा समाजातील विद्यार्थ्यासाठी मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून आयोजित कौशल्य विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यानी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयडियल कॉम्प्युटर्सचे संचालक कैलास म्हसके यांनी केले आहे.
महाराष्ट्र सारथी संस्थेच्या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास आणि संगणक कौशल्य विकास आणि MKCL (एमकेसीएल ) पुणे, यांच्यातर्फे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुका स्तरापर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सारथी लक्षित गटातील मराठा समाजातील १८ ते ४५ वयोगटातील पात्र व दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सारथी संस्थेमार्फत तालुका स्तरापर्यंत मोफत व्यक्तिमत्त्व विकास, आणि संगणक कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
आयडियल कॉम्प्युटर्सचे संचालक कैलास म्हस्के म्हणाले की, नासिक जिल्ह्यातील काही निवडक व अधिकृत अभ्यास केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कोर्समध्ये एकूण चार मॉड्यूल शिकविले जातील. Tally, Advance Tally, स्पोकन इंग्लिश, आयटी स्किल्स, बँकिंग फायनान्स व इन्शुरन्स, अडव्हान्स एक्सेल, वेब डिझाइन, फोटोशॉप, हार्डवेअर नेटवर्किंग, प्रोग्रॅमिंग असे एकूण दहापैकी चार कोर्स विद्यार्थी निवडू शकतो.
त्याचप्रमाणे कोर्स पुर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. सरकारचा या मागचा हाच हेतू की मराठा समाजातील विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. सिन्नर तालुक्यातील विद्यार्थांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही म्हसके यांनी केले आहे असून, अधिक माहिती साठी आपण 9226424261 या मोबाईलवर संपर्क करू शकता. व अधिक माहिती जाणून घेता येईल. त्याच बरोबर सर्व मराठा समाजातील मुलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा, कारण प्रत्येक बॅचचे वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. बॅचची मर्यादा नुसार नाव नोंदणी केली जाते, त्यासाठी प्रथम येणाऱ्याना संधी दिली जात आहे, याची विध्यार्थी यांनी नोंद घ्यावी.