अत्याधुनिक मोफत कॅन्सर तपासणी शिबिर यशस्वी – विविध संस्थांचा पुढाकार

अत्याधुनिक मोफत कॅन्सर तपासणी शिबिर यशस्वी – विविध संस्थांचा पुढाकार
76 नागरिकांची मोफत तपासणी, अत्याधुनिक चाचण्या विनामूल्य
गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर│ दि. 12 डिसेंबर 2025, www.gurunews.co.in
लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी, इंडियन कॅन्सर सोसायटी-मुंबई, एस. एम. बी. टी. वैद्यकीय महाविद्यालय धामणगाव, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर आणि श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स हॉल, रामनगरी येथे भव्य मोफत कॅन्सर जनजागृती व रोगनिदान शिबिर उत्साहात पार पडले.

कॅन्सरविषयक जनजागृती वाढविणे व ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक तपासण्या विनामूल्य उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिरात एकूण 76 महिला व पुरुषांची मोफत तपासणी करण्यात आली.

शिबिराचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत गाढे यांनी केले. शिबिरात HPV DNA, LBC, VIA, स्तन तपासणी, तोंडाची वैद्यकीय तपासणी, बीपी, रक्तशर्करा अशा महत्त्वपूर्ण चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. या सर्व तपासण्यांचा बाजारभाव प्रति व्यक्ती 15 ते 20 हजार रुपयांहून अधिक असून, नागरिकांना त्या विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिबिरासाठी कॅन्सर तज्ञ डॉ. अश्विनी देशमुख (मोरे), HOD – Preventive Oncology यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सोबीया शेख, डॉ. सुवर्णा वाळके, डॉ. नयन झांबरे, डॉ. अक्षदा पवार, सिस्टर म्हाळसा जाधव, तसेच सचिन रोंगटे आणि संदीप दोंदे यांनी सर्व लाभार्थ्यांची तपासणी करून मोलाची सेवा बजावली. शिबिराच्या यशात श्री. किशोर साळुंखे – फील्ड कोऑर्डिनेटर यांचेही विशेष योगदान लाभले.

कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक मा. श्री. संजयजी गिते, वरिष्ठ अधिकारी सुदर्शन तांदळे, नवनाथ गडाख, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. नारायणशेठ वाजे, कार्यकारी संचालक श्री. महेश कुटे, श्रीलेखा पतसंस्थेचे मॅनेजर श्री. कांताराम माळी, तसेच भगुरे सर आणि योगेश भारस्कर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत नाना वाजे, लायन्स क्लबचे अध्यक्ष बबन वाजे, खजिनदार प्रशांत शिंदे, डॉ. विष्णू अत्रे, अतुल अग्रवाल, डॉ. जितेन क्षत्रिय, डॉ. विजय लोहारकर, मनिष गुजराथी, वैशाली सानप, ललिता शिंदे, संगिता वाजे आणि डॉ. प्रशांत गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे सिन्नर शहरात आरोग्य जनजागृतीचा एक सकारात्मक संदेश पोहोचला असून भविष्यात अशाच उपयुक्त उपक्रमांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.



