सुदृढ व निरोगी समाजासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज – डॉ. झळके

सुदृढ व निरोगी समाजासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज – डॉ. झळके
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क :
आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत असून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी समाजात नैतिक मूल्ये रुजविण्याची आवश्यकता आहे. व्यसनमुक्ती काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. महा.अंनिस सिन्नर शाखेतर्फे
‘द दारूचा नव्हे तर द दुधाचा ! हे अभियान आज ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सिन्नरच्या विजयनगर येथील महात्मा बसवेश्वर चौकात आयोजित करण्यात आले. यावेळी महामित्र दत्ता वायचळे यांनी अंनिसच्या व्यसनमुक्ती अभियानाचे समर्थन करून तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.अंनिसचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे यांनी तरुण पिढीने मद्यपान करण्यापेक्षा दूध पिण्याचा सल्ला दिला , त्यामुळे शरीर निरोगी व सुदृढ बनते असे सांगितले.कवी व साहित्यिक किरण भावसार यांनी मद्यप्राशन ही अलीकडच्या काळात वाढत चाललेली प्रथा पाहून तरुणाई अधिकाधिक व्यसनाधीन होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अंनिसने व्यसनाला बदनाम करु या तसेच दारू ऐवजी दूध पिण्याचा उपक्रम राबवून व्यसनमुक्तीचा संदेश दिल्याबद्दल समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सिन्नर तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष दीपक भालेराव,प्रधान सचिव राजेंद्र मिठे, पदाधिकारी बाबासाहेब कलकत्ते, बापू चतूर,राजेंद्र काकडे,बस्तीराम कुंदे ,सागर भालेराव,भाऊसाहेब पवार,दिलीप सगर, ॲड. शांताराम चांदोरे, दुर्गेश कोकणे, प्रसाद भावसार, गणपतराव जाधव, भीमा गवळी, आर्यन आहेर, ऋषिकेश कोकाटे, शिवराज जांगिड,देवराज जांगिड, रोहित गवळी, रमेश मुजळकर, अभय पाटील, शिवराज गुजर, दगु गीते, संजय निकम, राजेंद्र दिवे, प्रमोद काकडे, एस.टी.पांगारकर, किरण लोहारकर,मनोज भंडारी, पंकज भंडारी आदी उपस्थित होते. माॅं शाकांबरी स्वीट्सचे संचालक नंदकिशोर जांगिड व सुनील जांगिड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंनिसचे तालुका कार्याध्यक्ष दीपक भालेराव यांनी केले. आभार सचिव राजेंद्र मिठे यांनी मानले.