साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न…

साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न…
नाशिक | दि. २५ डिसेंबर २०२३, गुरू न्यूज नेटवर्क :
साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश चौधरी व प्रमुख पाहुणे प्रा. श्रीकांत सोनवणे, स्वातंत्र सैनिक हुतात्मा स्मारक समिती सचिव श्रीराम कातकाडे, सुभाष चंद्र बोस यांचे सेक्रेटरी असलेले पटेल सर व शालेय विद्यार्थी, शिक्षक इतर कर्मचारी, आणि आजी माजी सर्व ज्येष्ठ नागरिक संघ व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमांचे आयोजन अतिशय सुंदर आनंदमयी वातावरण लहान विद्यार्थी यांच्या समूह गीताने झाले. त्यानंतर सर्व साने गुरुजी अभ्यासक, व ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करून साने गुरुजी बद्दलचे विचार ताजे केले, आणि एक नवं-प्रेरणा निर्माण केली. त्यांमध्ये साने गुरुजी यांनी महाराष्ट्रचे दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हरिजन, दलित, मागासवर्गयांसाठी प्रवेश चळवळ सुरू केली. “श्यामची आई ” हे पुस्तक थोडक्यात त्यांच्या स्वातंत्र चळवळीतले योगदान, त्यांना झालेला कारावास, अनेक माध्यमातील चळवळ समजून सांगण्यात वक्त्यांनी व शिक्षकांनी यावेळी सांगण्यात आले.
तसेच श्रीकांत सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वातंत्र सैनिक साने गुरुजी बद्दल विशिष्ठ कथा-कादंबरी थोडक्यात माहिती दिली. विशेष म्हणजे २०२३ चा वर्षारंभ होत असताना हुतात्मा स्मारक नाशिक यांच्या वतीने विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करून योग्य ते मार्गदर्शन व विशेष लक्ष वेधत असे रहणुमा उर्दू शाळेमधील विद्यार्थिनी यांनी ” खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ” या कविता खऱ्या अर्थाने आज ऐकून आत्मसात झाली. साने गुरुजी आणि मराठी भाषेतील निबंध बक्षीस सोहळा आयोजित केला त्याबद्दल उत्सुकता आणि अभिमानास्पद अभिनंदन केले..
सदर कार्यक्रम नाशिक जिल्हा सत्र न्यायालय व मध्यवर्ती बस स्थानक समोरील हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र सैनिक समिती व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व विजयी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रहनूमा उर्दू शाळा आणि महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मधील मुलांनी सहभाग घेतला होता. यावेळी सदर शिक्षिका यांनी उत्कृस्टरित्या असे मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजून दिले. कार्यक्रमाची सांगता ही” हम होंगे कामियाब ” हे व भारताचे राष्ट्रीय गीत गाऊन व करण्यात आले.