निफाड येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार, नागरिकांमध्ये नाराजी पण..?

निफाड येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार, नागरिकांमध्ये नाराजी पण..?
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क : –
निफाड येथे सायंकाळी अचानकपणे शेतीमालाला भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू झाले. आणि अचानक झालेल्या दगलीमुळे पोलिसांनी शांततेचे आवाहन केले तरी देखील संतप्त आंदोलकांनी दंगल सुरू केल्याने पोलिसांना कठोर भूमिका घेणे भाग पडले. त्यामुळे लाठीचार व अश्रुधूराचा मारा करावा लागला. त्यामुळे दगलीवर नियंत्रण ठेवणे पोलिसाना शक्य झाले.
लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात काही शेतकरी अचानक घोषणाबाजी देत असताना, कांद्यासह टोमॅटोला भाव मिळालाच पाहिजे. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. याबाबत निफाड पोलिसांना माहिती मिळताच तातडीने पोलिस यंत्रणा पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दल, रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या. शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन करत असताना देखील आंदोलक ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीचार व असरुधुराच्या नलकड्या फोडून जमाव पागविण्यात पोलिसांना यश आले.
अर्थात हे आंदोलन देखील खोटे होते. आणि पोलिसांचा लाठीचार देखील खोटा होता. हे सर्व होते पोलिसांकडून करण्यात आलेला दंगा प्रतिबंधाचा सराव करण्यात आला होता. आगामी काळात गणेशोत्सव व इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रणासाठी पोलिसांकडून केली गेलेली ही रंगीत तालीम होती. भविष्यात काही सामाजिक ताणतणाव निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व परिस्थिती हाताळण्यास पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचे या प्रात्यक्षिक यातून दिसून आले. यासाठी पोलिसांनी निफाड येथील बाजार समिती पटांगणात प्रात्यक्षिक घेतले. याचा एक भाग म्हणून सदर प्रात्यक्षिक राबविण्यात आल्याचे समजताच नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू महाजन यांनी पोलिसांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी सायखेडा, लासलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.