संदीप सेनभक्त निवडणुकीच्या निमित्ताने उतरले क्रिकेटच्या मैदानात

संदीप सेनभक्त निवडणुकीच्या निमित्ताने उतरले क्रिकेटच्या मैदानात
गुरु न्यूज नेटवर्क, नाशिक, दि. 01 मे 2025 www.gurunews.co.in
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील सक्रिय असलेले संदीप सेनभक्त निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. गेल्या २१ वर्षांपासून त्यांचे नाशिक जिल्हा क्रिकेटशी नातं जोडले गेलं आहे. या काळात ते निःस्वार्थपणे मैदानावर आणि संघटनेत सेवा देत आहे. त्यांना अनंत अडचणी आल्या, आर्थिक परिस्थिती खराब झाली तरी ते मेहनतीने व्रतस्थपणे क्रीडा क्षेत्राची सेवा करीत आहे. त्यांनी एकनिष्ठतेने मैदानावर प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी कधीही पदाची मागणी केली नाही, पण खेळापायी निष्ठावान योगदान नेहमी दिलं आहे. आज त्यांच्या या २१ वर्षांच्या सेवेला तुमच्या मतदारांच्या विश्वासाची गरज आहे. म्हणूनच त्यांनी एकमताने काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे आहेत, त्यांची माझी प्रामाणिक इच्छा आहे की, लोकांच्या पाठिंब्याने ते नाशिकच्या क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जातील. न्याय, निष्ठा आणि सेवा या तत्त्वांवर ते काम करत राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने बदल शक्य आहे, असा त्यांचा दावा असल्याने बॅट या चिन्हावर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन करतांनाच लोकांच्या प्रेमासाठी आणि नाशिक क्रिकेटच्या सेवेसाठी व विकासासाठी त्यांना पाठिंबा हवा आहे, असे आवाहन त्यांचे समर्थक करीत आहेत.