मैदानी खेळ विद्यार्थ्यांना नक्कीच आरोग्यदायी ठरतील : डॉ. आनंद नागरे

मैदानी खेळ विद्यार्थ्यांना नक्कीच आरोग्यदायी ठरतील : डॉ. आनंद नागरे
गुरु न्यूज नेटवर्क : सिन्नर (प्रतिनिधी): www.gurunews.co.in
विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळातही प्रावीण्य मिळवावे, व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सिन्नर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद नागरे यांनी केले आहे.
खेळामुळे आपले आरोग्य सुदृढ राहते, हे अधोरेखित करत, “खेलोगे कुदोगे तो तंदुरुस्त रहोगे,” असे ते म्हणाले. सिन्नर तालुक्यातील औद्योगिक क्रांतीचे जनक आणि हजारो हातांना रोजगार देणारे दिवंगत नानासाहेब गडाख यांचे सामाजिक कार्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातील योगदानही अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन डॉ. आनंद नागरे यांनी एस.जी. पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम येथील क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रमात केले.
डॉ. आनंद दगू नागरे हॉस्पिटल, सिन्नर यांच्या वतीने माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एस.जी. पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम या शाळेस क्रीडा साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉ. नागरे आणि त्यांच्या नेशन फर्स्ट फाउंडेशनचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असून, त्यांनी आतापर्यंत सिन्नर तालुक्यातील अनेक भागांत तरुणांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. तसेच, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी तरुणांना खेळाचे साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे. असे मत लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी व्यक्त केले. इतरांनीही डॉ. आनंद नागरे यांच्या या कार्याचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी, संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, संचालक विजय गडाख, सी ईओ अभिषेक गडाख, प्राचार्या शुभदा कुलकर्णी, क्रीडा शिक्षक गौरव खुळे आणि दीपक तांबे यांच्याकडे डॉ. नागरे यांनी बॅडमिंटन, कॅरम, चेस, क्रिकेट, व्हॉलीबॉल यांसारख्या विविध खेळांचे साहित्य तसेच आरोग्याचे किट सुपूर्द केले. त्यांनी केवळ साहित्यच दिले नाही, तर हे खेळ शास्त्रीय पद्धतीने कसे खेळावे याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना दिले. पुढील वेळी शाळेला भेट दिल्यावर चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करून बक्षिसे देण्याचे आश्वासनही डॉ. नागरे यांनी विद्यार्थ्यांना दिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थितांना विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा पूर्ण केली. प्राचार्या कुलकर्णी, क्रीडा शिक्षक खुळे आणि तांबे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर प्राचार्या कुलकर्णी आणि शुभांगी मोगल यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, शालेय समितीचे उपाध्यक्ष विकास गिते, प्राचार्या शुभदा कुलकर्णी, अनिता थोरात, दीपक तांबे शुभांगी मोगल, गौरव खुळे आणि तुषार खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. आनंद नागरे यांचे कार्य अभिमानास्पद !
डॉ. आनंद नागरे यांनी आतापर्यंत शेकडो ग्रामीण भागांतील तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी स्वखर्चाने अनेक ठिकाणी व्हॉलीबॉल साहित्य देऊन खेळाचे प्रशिक्षणही दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे आज अनेक तरुण खेळाकडे वळले असून, त्यांचे हे कार्य अतिशय गौरवास्पद आहे.