नाशिक येथील इंदिरानगर मध्ये मधुमेह दिनाला प्रतिसाद

नाशिक येथील इंदिरानगर मध्ये मधुमेह दिनाला प्रतिसाद
जॉगिंग ट्रॅकवर जनजागृती व्याख्यान व आरोग्य शिबिर
गुरू न्यूज नेटवर्क, नाशिक । www.gurunews.co.in
इंडियन रेड क्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखा, श्री. साईबाबा हार्ट इन्स्टिट्युट व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक कमिटी तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व-विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित जनजागृती व्याख्यान आणि आरोग्य शिबिर नागरिक आणि रुग्णांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाले.
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे आयोजित या उपक्रमांत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी उपस्थितांशी मधुमेह, हृदयरोग आणि जीवनशैली या विषयावर संवाद साधला. सात्विक आहार, पुरेसा व्यायाम, नियमित तपासणी व उपचार, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली ही मधुमेह वर्षानुवर्षे नियंत्रित ठेवण्याची पंचसूत्री आहे. असे प्रतिपादन डॉ. धर्माधिकारी यांनी केले. यानंतर फिजिशियन डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी यांनी मधुमेहाची कारणे आणि प्रतिबंध यावर प्रकाशझोत टाकला.
यावेळी व्यासपीठावर रेडक्रॉस सचिव डॉ. सुनील औंधकर, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. प्रतिभा औंधकर, जॉगिंग ट्रॅक कमिटीचे अवधूत कुलकर्णी, सुहास आहिरे, प्रमुख अतिथी म्हणून मा. संजयजी गिते, संपत पाटील, हरीश चौबे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वीणा दीदी, डॉ. राजेश जावळे, डॉ. गुरुदेव बिरारी, उज्ज्वला दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.
याचवेळी आयोजित मोफत हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब तपासणी व आरोग्य शिबिरात श्री. साईबाबा हॉस्पिटलचे डॉ. तेजस सोनवणे आणि सहकाऱ्यांनी २४० हुन अधिक रुग्णांच्या कार्डिओग्राम, रक्तामधील साखर, रक्तदाब आदी तपासण्यांसह मार्गदर्शन केले. एमडी मेडिसिन परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. उपक्रम यशस्वितेसाठी सचिन चव्हाण, चंद्रकांत गोसावी, संकेत खोडे, सुनील खोडे मोटकरी, डॉ. तस्मिन शेख, अरुण लबडे, अरुण मुनशेट्टीवार, उमा पारसरे, योगिता महाले, महेश सोनवणे, गुलाब इनामदार, मनिष बोरसे प्रयत्नशील होते.



