सुखदेव डुंबरे यांचा सेवापूर्ती सोहळा

सुखदेव डुंबरे यांचा सेवापूर्ती सोहळा
गुरू न्यूज नेटवर्क | दि. १४ ऑक्टोबर २०२३ :
भारतीय सेना दलात नायब सुभेदार म्हणून ३५ वर्षे देशाची सेवा करणारे आमचे सर्वांचे दुसिगवाडी ( वावी) येथील मित्र सुखदेव विठोबा डुंबरे यांचा आज सेवापूर्ती सोहळा आज संपन्न होत आहे.
देशाची सेवा करत असताना १९८९ साली आर्मीत भरती झाल्यानंतर प्रथम देवळाली कॅम्प, आसाम, दिब्रूगड, श्रीनगर, राजस्थान, बाडमेर, श्रीनगर, मुंबई, गोरखपूर, अरुणाचल प्रदेश, पुणे, भंडारा, लेह, भटिन्डा , फुलगाव, केरला, आदी ठिकाणी काम करत असताना ३५ वर्षे देश सेवा केली. कुटूंबाची जबाबदारी सांभाळण्याचे कर्तव्य माझी पत्नीने पार पाडली व आई वडील यांची सेवा तिच्या माध्यमातून झाली. त्यामुळे मी देशसेवा करू शकलो असे मत सुखदेव डुंबरे यांनी व्यक्त केले. आज ही दोन मुले आई यांची मला नेहमी प्रेरणा राहिली. त्यामुळे ३५ वर्षे कशी गेली ते समजले नाही. वावी येथे शिक्षण घेत असताना मला लाभलेला मित्र परिवार खूपच चागला मिळाला त्याचाही मला फार अभिमान असल्याचे डुंबरे यांनी गुरू न्यूजसी बोलताना आपले मत व्यक्त केले.
आजच्या दि. १४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ९:३० वाजता सेवापूर्ती सोहळया निमित्ताने ह. भ. प. विश्राम उगले महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व मित्र परिवार, नातेवाईक, हितचिंतक यांनी उपस्तीती लावावी अशी नम्र विनंती डुंबरे कुटूंबियांनी केली आहे.