संत श्रेष्ठ श्री. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा का ?लूटमारी सोहळा !

संत श्रेष्ठ श्री. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा का ?लूटमारी सोहळा !
सिन्नर | गुरु न्युज नेटवर्क : www.gurunews.co.in
दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील अनेक संतांच्या कर्मभुमीतुन व पवित्र क्षेत्रातुन पंढरपुर येथे श्री पांडुरंगाला भेटण्यासाठी पालख्या काढल्या जातात यामध्ये लाखो वारकरी विठु रायाचे भजन किर्तन करत नामघोष करत निसर्गाचा आनंद घेत पंढरपुर येथे रवाना होत असतात.
त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर आषाढी वारी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी त्र्यंबकेश्वर ते पंढरपुर अशी मार्गस्थ होत असते. ही पालखी महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा व सोलापुर जिल्हा अशा जिल्ह्यांमधुन मार्गस्थ होते.
नाशिक जिल्ह्यातुन मार्गस्थ होणे करीता या पालखीला ७ दिवस लागतात. ७ दिवसांमध्ये मौजे दातली येथे एक वारकरी रिंगण ही आयोजित करतात व भजनाचा आनंद लुटतात. अनेक दाते अनेक सांप्रदायिक भाविक तसेच ग्रामपंचायतीत सेवक सेवा भावी संस्था या पालखीला अनेक प्रकारच्या सुविधा पोहचवतात. महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्था वारी दरम्यान वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा, जलसेवा, अन्न सेवा इत्यादी अनेक प्रकारच्या सेवा पुरवत असतात.
संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते निहाळे, ता. सिन्नर इथपावेतो ६ दिवस नाशिक जिल्ह्यातुन मार्गस्थ होत असते व नाशिक जिल्ह्यात ५ मुक्काम असतात. ६ वा मुक्काम नगर जिल्ह्यात होतो. परंतु नाशिक जिल्हा परिषदेने सदर वारीचा ७ दिवसांचा नाशिक जिल्ह्यातील खर्च तब्बल ६,६१,१२,५००/- एवढा दाखविलेला आहे व हे कमी पडले की काय आणखी जादा रक्कमेच्या मागणीचे पत्रक ही शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेले आहे. यात ज्या लोकोपयोगी सेवा जिल्हा परिषदेने खालील तक्यात्यानुसार मागणी केलेली आहे. यावर विश्व हिंदु परिषद नाशिक जिल्हा ग्रामीणने तीव्र आक्षेप घेतलेला असुन या निर्मल वारी मध्ये एक पथक विश्व हिंदु परिषद नाशिक जिल्हा ग्रामीण तर्फे नियुक्त केले जाईल.
जिल्हापरिषद नाशिक यांनी जाहीर केलेल्या पत्रकामध्ये दर्शविण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधा या केवळ निवृत्ती नाथांच्या पालखी सोहळ्यात नाशिक जिल्ह्यासाठीच्या आहेत. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महराज समाधी संस्थानने देखीन या संबंधाने नाशिक जिल्हा परिषदेला स्पष्ट विचारणा केली पाहिजे. तसेच जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या २० सेवांची अंमल बजावणी होते का? त्याची आवश्यकता आहे का? असे अनेक प्रश्न उभे राहतात. त्यामुळे निर्मल वारीचे नांव व जिल्हापरिषदेचे गांव अशी स्थिती निर्माण होऊ नये व शासनाचा खर्च वारकऱ्यांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे या कडे संस्थानने लक्ष द्यावयास पाहिजे.
बातमी सोबत विश्व हिंदु परिषद नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब देशपांडे यांनी नाशिक जिल्हा परिषदेने जाहीर केलेले निधीचे विवरण पत्रच समवेत दिलेले आहे.
शासनाकडुन कोणत्या आवश्यक सुविधा घ्याव्यात याबाबत नाशिक जिल्हापरिषद व संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर संस्थान यांनी योग्य तो समन्वय ठेऊन ७ दिवसांपुरता नाहीतर ४७ दिवसाचे शासकीय खर्चाचे नियोजन करुन निधीची मागणी करुन अत्यावश्यक सेवा वारकऱ्यांपर्यंत पोहचली जाईल याचे नियोजन करावे.
जिल्हा परिषद नाशिक यांनी शासनाने निर्मल वारी सन २०२४ नाशिक जिल्ह्यातील संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज पालखी मुक्कामी गावांमध्ये सहभागी वारकरी व भाविकांना विवीध जिवनावश्यक सुविधा भाडेतत्वावर उभारणी कामी किती निधी आला, कोणत्या सुविधांसाठी आला हे जाहिर करावे. असे आवाहनही विश्व हिंदु परिषद नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब देशपांडे यांनी केले आहे.
अध्यक्ष संजय (बाळासाहेब) देशपांडे विश्व हिंदु परिषद नाशिक जिल्हा ग्रामीण