“सूरगिरी” व “हेमाडि उपाख्य हेमाद्रीपंत” या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा!

“सूरगिरी” व “हेमाडि उपाख्य हेमाद्रीपंत” या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा!
नाशिक | गुरु न्यूज नेटवर्क, दि. ०९ ऑगस्ट २०२४
www.gurunews.co.in
सिन्नर येथील लायन्स क्लब सिन्नर सभागृहात शनिवार, दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी, सकाळी ११ वाजता “सूरगिरी” व “हेमाडि उपाख्य हेमाद्रीपंत ” या दोन अनमोल खजिना असणाऱ्या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा सन्माननीय खासदार मा. श्री. राजाभाऊ वाजे आणि आमदार मा. श्री. माणिकरावजी कोकाटे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
प्रा. पंडितराव देशमुख यांनी लिहिलेल्या “सूरगिरी” व “हेमाडी उपाख्य हेमाद्रीपंत” या ग्रंथ साहित्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आमदार मा. श्री. सत्यजित तांबे, मा. नगराध्यक्ष श्री. हेमंतराव वाजे व इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक मा. प्रा. डॉ. संजय पुरी, साहित्य समीक्षक मा. डॉ. संजय बोरुडे, मध्ययुगीन इतिहास व मराठा इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक मा. श्री. केतन पुरी हे उपस्थित राहणार आहेत.
या ग्रंथाचे प्रकाशक श्री. शार्दुल देशमुख व लेखापरीक्षक ( C. A) मा. श्री. योगेश देशमुख, अँड. निलिमा देशमुख, श्री. संदेश देशमुख, श्री. मुकेश देशमुख यांनी या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहेत.