“सूरगिरी” व “हेमाडि उपाख्य हेमाद्रीपंत” या दोन ग्रंथांचे आ. तांबे यांचे हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न!

“सूरगिरी” व “हेमाडि उपाख्य हेमाद्रीपंत” या दोन ग्रंथांचे आ. तांबे यांचे हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न!
नाशिक | गुरु न्यूज नेटवर्क, दि.12
ऑगस्ट २०२४
www.gurunews.co.in
ख्यातनाम साहित्यिक, इतिहास तज्ञ व संशोधक, विचारवंत, चित्रकार व लेखक प्रा. श्री. पंडितराव कारभारी देशमुख यांच्या “सुरगिरी” (राष्ट्रकूट या यादव घराण्याच्या योगदानावरील कादंबरी) व ” हेमाडि उपाख्य हेमाद्रीपंत ” या अनमोल चिकित्सक समीक्षा ग्रंथाचे प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा युवा आमदार श्री. सत्यजित तांबे यांचे हस्ते संपन्न झाला.
सिन्नर येथील लायन्स क्लब च्या सभागृहात मान्यवारांचे हस्ते शनिवार दि. १० ऑगस्ट, २०२४ रोजी पार पडला. सदर सोहळ्यास मा. खासदार राजाभाऊ वाजे, व मा. आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यस्त कामगिरीमुळे स्वतः हजर नसल्याने फोन वरून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रमुख उपस्थिती व सिन्नरचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. हेमंत वाजे हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ व डेक्कन कॉलेज, पुणे चे श्री. केतन पुरी, अहिल्यादेवी नगरचे साहित्य समीक्षक डॉ. संजय बोरुडे, भाऊसाहेब संतुजी थोरात कॉलेज संगमनेरचे प्राचार्य श्री. दीनानाथ पाटील यांनी सदर सोहळ्यात आपला इतिहास, परंपरा व विविध ऐतिहासिक घराणे यांबाबत उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले.
टेक्श्वर पब्लिकेशन्सचे प्रकाशक श्री. शार्दूल देशमुख यांनी या ऐतिहासिक कादबंरी व ग्रंथाची प्रकाशने वाचकांसाठी प्रकाशित केलेली आहेत.
युवा आमदार सत्यजित तांबे यांनी प्रा. देशमुख याचे साहित्यिक कार्याची प्रशंसा करून या साहित्यकृती पुढील पिढयांना इतिहासाचे सुयोग्य आकलन करण्यास मोलाची कामगिरी बजावतील असे गौरवोद्गार काढले.
सिन्नर तथा सेऊनदेश च्या राष्ट्रकुटांच्या गौरव शाली इतिहासाच्या सहभागाचा प्रा. पंडितराव देशमुख यांनी श्रोत्यांना उलगडून देऊन एका आगळ्या अनुभूतीचा व माहितीचा साक्षात्कार श्रोते वर्गाला करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. श्री. विठ्ठल शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट सौ. प्राजक्ता योगेश देशमुख यांनी केले.