सिन्नरला गावाबाहेरील श्री भगवती देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

सिन्नरला गावाबाहेरील श्री भगवती देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क, प्रतिनिधी – श्यामसुंदर झळके
Www.gurunews.co.in
सिन्नरची ग्रामदेवता गावाबाहेरची श्री भगवती देवी मंदिरात गेल्या आठ दहा दिवसांपासून नवरात्रोत्सवाची तयारी सुरु आहे. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.रंगरंगोटी, मंदिरावरील भव्य विद्युत रोषणाई पूर्ण झाली असून देवी ट्रस्टने या वर्षी आमूलाग्र बदल केला असून मंदिराचा गाभारा प्रशस्त व भव्य केल्यामुळे दुरून देवीचे दर्शन घेता येणार आहे.मूर्तीला आकर्षक रंग देण्यात आला असून विलोभनीय मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.दर्शन रांगेसाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.आतापासूनच नवरात्रोत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी मोठ मोठे जाहिरात फ्लेक्स लावण्यात आले आहेत.गुरुवारी (ता. ३ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता खासदार राजाभाऊ वाजे व सौ.दीप्ती वाजे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पाचव्या माळेला ललिता पंचमीस मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिना निमित्ताने सकाळी युगंधर व वैष्णवी वाजे तसेच विश्वस्त सुधीर व अरूणा गवळी यांच्याहस्ते महापूजा होणार आहे.तर रात्री ९ वाजता माहेश्वरी युवक मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सहाव्या माळेला दुपारी ३ वाजता शारदा महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ तसेच गुजराथी महिला मंडळाकडून श्री सूक्त पठण व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान खासदार पुल ते देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून पादचारी व दुचाकी,चारचाकी वाहन धारकांना त्रास होत आहे.सिन्नर नगरपालिकेने रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी सिन्नरकरांनी केली आहे.