सिन्नर केमिस्ट संघटनेचा आदर्श फार्मासिस्ट पुरस्कार स्तुत्य उपक्रम – खा. राजाभाऊ वाजे

सिन्नर केमिस्ट संघटनेचा आदर्श फार्मासिस्ट पुरस्कार स्तुत्य उपक्रम – खा. राजाभाऊ वाजे
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
औषध विक्री क्षेत्रात फार्मासिस्टचे महत्वाचे योगदान आहे. डॉक्टर व रुग्ण यामधील महत्वाचा दुवा असून, तो रुग्णांचे समुपदेशन देखील करतो. अशा सेवाभावी फार्मासिस्टचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करणाच्या केमिस्ट संघटनेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन खा. राजाभाऊ वाजे यांनी केले.
सिन्नर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी फार्मा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या (२५ सप्टेंबर) निमित्ताने आयोजित केलेल्या आदर्श फार्मासिस्ट पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने झाली. व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासन नाशिकचे सहआयुक्त मिलिंद पाटील, राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे, नाशिक जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुदेश आहेर, सह सचिव सचिन वाळुंज, मा. जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, रवींद्र पवार, सिन्नर केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय सांगळे आदी उपस्थित होते.
आदर्श फार्मासिस्ट पुरस्काराचे मानकरी
१) राजेंद्र हांडोरे (शहर) २) श्रीराम वाघ दोडी (ग्रामीण) ३) महिला फार्मासिस्ट, योगिता वाजे, सिन्नर ४) डॉ. प्रा. विवेकानंद काशीद ( फार्मसी शिक्षण क्षेत्र) ५) सुनीता मुटकुळे ( औषध उत्पादन क्षेत्र) ६) डॉ. प्रा. मीनल नारखेडे (फार्मसी शिक्षण क्षेत्र)
यावेळी सीमंतिनी कोकाटे यांनी समाजात फार्मासिस्टला आदराचे स्थान मिळावे. कारण तो रुग्ण व ग्राहकांची उत्तम सेवा करून त्यांचे समुपदेश, औषध साक्षरतेचे काम करतो. अन्न व औषध प्रशासनाचे सहायुक्त मिलिंद पाटील यांनी फार्मासिस्टनी कायद्याचे पालन करून रुग्णांना ग्राहकाभिमुख विनम्र सेवा देऊन समाजात लौकिक वाढविण्याचे आवाहन केले. फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी फार्मासिस्ट अपडेट राहाण्यासाठी व स्पर्धेत टिकण्यासाठी कौन्सिल विविध कोर्सचे आयोजन करते त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुदेश आहेर यांनी फार्मासिस्ट तसेच केमिस्टच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. नाशिक जिल्हा संघटनेचे सहसचिव सचिन वाळुंज यांनी डॉ. रेड्डी लॅबोरेटरी फार्मा कंपनीचे प्रायोजकत्व मिळवून सिन्नर केमिस्ट संघटनेला सहकार्य केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सचिन गोराडे, संदीप चतुर, राहुल बुरड, जयेश गाढवे, जगदीश भन्साळी, सुदेश खुळे, बाळासाहेब सदगीर, रमेश सदगिर, अभिषेक खर्डे, संदीप पवार, निलेश उगले, अनिल वाजे, अमित दराडे, दिलीप कराड आदी उपस्थित होते. जिल्हा संघटनेचे निमंत्रित सदस्य अतुल झळके यांनी प्रास्ताविक केले तर आभार सचिन वाळुंज यांनी मानले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील केमिस्ट तसेच पुरस्कारप्राप्त फार्मासिस्टचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.