ताज्या घडामोडी
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत डॉ. राजेंद्र कमानकर यांच्या कवितेला पुरस्कार

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत डॉ. राजेंद्र कमानकर यांच्या कवितेला पुरस्कार
मुंबई | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
अवतरण अकादमी, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत डॉ. राजेंद्र कमानकर यांच्या “हिरवं सपान” ह्या कवितेला लक्षवेधी काव्यरचना म्हणून गौरविण्यात आले.
ह्या स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या ५९ कलाकृतींमधून ८ कवितांची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती.
मुंबईच्या बोरिवली येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रांगणात दि. २२ सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ६ वाजता झालेल्या सोहळ्यात ह्या आठही कवितांचे मान्यवरांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले.
यावेळी सादरीकरणासाठी निवड झालेल्या डॉ. राजेंद्र कमानकर यांच्या “हिरवं सपान” या शेतकऱ्यांच्या व्यथांवरील वरील कवितेला विशेष लक्षवेधी काव्यरचना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सुप्रसिद्ध लेखिका अनुराधा नेरूरकर, चित्रपट दिग्दर्शक मनोहर सरवणकर, अवतरण अकादमी चे अध्यक्ष लेखक संभाजी सावंत, सेक्रेटरी विजय लाड, परीक्षक कवयित्री माधुरी बुधकर यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन डॉ. राजेंद्र कमानकर यांचा सन्मान करण्यात आला.