ताज्या घडामोडी
व्हिजन महिला विकास नागरी सहकारी पतसंस्थेची महिलादिनी स्थापना

व्हिजन महिला विकास नागरी सहकारी पतसंस्थेची महिलादिनी स्थापना
सिन्नर, गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नरमध्ये नव्याने सुरू होत असलेली व्हिजन महिला विकास नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना महिला दिनाच्या मुहूर्तावर नुकतीच करण्यात आली. त्या पतसंस्थेचे प्रमाणपत्र सिन्नर सहाय्यक निबंधक मा. संजयजी गीते साहेब यांच्या हस्ते आज देण्यात आले. या
संस्थेची स्थापना करण्यामागे श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे चेअरमन मा. नारायणशेठ वाजे यांच्या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थेचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व संचालक पदाधिकारी महिला ह्या पदवीधर असून, पुढील शिक्षण घेत आहे.
या सर्व महिला सुशिक्षित व स्वयंरोजगार करत असून, काही महिलांचा स्वतःचा उत्तम असा व्यवसाय सुरु आहे. या महिला आजही कर्तव्यदक्ष महिला म्हणून काम करत आहेत. या महिलांनी विविध क्षेत्रात आपला नावाचा ठसा उमटविला असून, त्यांनी महिलांचा विकास होऊन
स्वतःच्या पायावर उभे राहून नवीन रोजगार निर्मिती करून आपल्या संसारामध्ये हातभार लागेल या हेतूने त्यांनी कर्तव्य करून रोजगार निर्मिती करावी, हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे. या पतसंस्थेत काम करण्यासाठी या महिलांना चालना देण्याकरिता सहाय्यक निबंधक सन्माननीय संजयजी गीते यांचे मार्गदर्शन लाभणार
आहेत. त्याचबरोबर श्री. नारायणशेठ वाजे, व श्री. अरुणशेठ वारुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल सुरू होणार आहे. ही संस्था सुरू करण्याकरिता करिता श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक महेश कुटे, श्रीलेखा पतसंस्थेचे व्यवस्थापक कांताराम माळी, संचित नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र घोलप त्याचबरोबर आयुब शेख यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
व्हिजन महिला विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नर या संस्थेच्या मुख्यप्रवर्तक सौ. योगिता प्रदिप वारूंगसे प्रगतशील शेतकरी असून, श्रीमती वैशाली नारायण वाजे- नौकरी, सौ. अंजली महेश कुटे- नौकरी, सौ. शितल संकेत माळी – नौकरी, श्रीमती. अश्विनी अरूण वारूंगसे- नौकरी, सौ. सोनाली विकास ढोली- व्यावसायिक, सौ. तृप्ती नितीन खरनार -व्यावसायिक, सौ. किर्ती अमोल वाजे- नौकरी, सौ. अर्चना अंबादास थेटे – व्यावसायिक, सौ. शोभा माणिक वाजे – नौकरी, सौ. प्रियंका सागर जोशी- नौकरी करत आहेत. तसेच