जेव्हा येवला बसस्थानकांच्या भिंती पर्यावरणाचा बोलका संदेश देतात!

जेव्हा येवला बसस्थानकांच्या भिंती पर्यावरणाचा बोलका संदेश देतात!
नाशिक | गुरू न्यूज नेटवर्क, दि. १२ जानेवारी २०२४ :
राज्य परिवहन महामंडळातर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान या अंतर्गत राज्यस्तरीय बस स्थानकांकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यांत आलेले आहे. राज्य स्तर व प्रदेश याकरिता प्रथम बक्षिस अनुक्रमे रु.५० लाख व रु. १० लाख ठेवण्यांत आलेले आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या दोन सर्वेक्षणामध्ये येवला आगार ‘अ’ बसस्थानक प्रवर्गात नाशिक जिल्हयात प्रथम आहे. या पुढील टप्याकरिता येवला बसस्थानकाच्या भिंती सुध्दा बोलताय असे दिसुन येत आहे. बसस्थानकातील दर्शनी भिंतीवर डोंगर दऱ्यातून मार्गक्रमण करणारी ‘विठाई बस’चे आकर्षक चित्र रेखाटण करण्यात आलेले आहेत. त्या हस्तकलेतुन जणु पंढरीचा विठ्ठल वारकऱ्यांसह निसर्गाची हरितवारीच करतोय असे ! व रयतेला पर्यावरणाचे महत्वच सांगतोय असे वाटते!
त्याचप्रमाणे बसस्थानकाच्या इतर दर्शनी भिंतीवर आदिवासी बंधू-भगिनींचा डोंगरांती हस्तकलेचे चित्र केलेले आहेत.
याप्रमाणे देवाला बसस्थानक आहेत व परिसरात चाफा, पाम ट्री, साईडनी कुंड्या ठेवण्यात येवुन बसस्थानकाचा परिसर स्वच्छ – सुंदर मोहक करण्यात आला आहे, या सुशोभिकरण करण्याकरिता येवला येथील नितीन गारमेंट व शिसाल पैठनी या फर्मचे संचालक श्री. नितीन बजे यांनी मोलाचे योगदान देवून, येवला गावाबददल आपलेपणा दर्शविल्याचे दिसून येत आहे.
येवला बसस्थानकाच्या भिंतीना बोलकेपणा श्री. लक्ष्यमन साळी पेंटर यांच्या कुंचल्यातून प्राप्त झाला आहेत.
येवला बसस्थानकाच्या सौंदरीकरण व स्वच्छता करीता नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक श्री. अरुण सिया, येवला आगाराचे पालक अधिकारी उर्फ विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी श्री. विजय झगडे, आगार व्यवस्थापक प्रशांत हिरे, आगारातील सर्व प्रशासकिय चालक, वाहक यांत्रीक कर्मचारी यांनी मोठ्या स्वरुपात विशेष परिश्रम घेतले असल्याचे दिसुन येत आहे.