सिन्नरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
सिन्नरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नरचा वाढता विस्तार आणि वाढती गर्दीचा फायदा घेत चोरांनी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांचे गळ्यातील सोनसाखळी चोरीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे.
शुक्रवार दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास देवदर्शन करून घरी जात असताना जगताप परिवारातील महिलेच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळा वजनाची सोन्याची पोत चोरांनी चोरून पळ काढला असता, समोरून येणाऱ्या एक्टिवा गाडीने पाठलाग केला परंतु चोरांकडे स्पोर्ट्स पल्सर असलेली काळ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेल्या गाडीवरून चोरांनी पळ काढला. पाठलाग करत असताना भैरवनाथ मंदिर, लोकनेते विद्यालय, महात्मा फुले पुतळा मार्गे नाशिक कडे चोरांनी पलायन केले असल्याचे, सदर एक्टिवा चालकाने पाठलाग करत असताना त्यास चोरांना पकडणे शक्य झाले नाही.
सदर घटनेचा तपास सिन्नर पोलीस करत असले तरी नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी श्री. संभाजीराव गायकवाड हे किती गांभीर्याने घेतात हे पाहावे लागेल.