सिन्नरच्या महसूल विभाग अधिकारी यांच्या मनमानी कारभार
सिन्नरमध्ये जनता दरबार घेण्याची गरज
सिन्नरच्या महसूल विभाग अधिकारी यांच्या मनमानी कारभार
सिन्नरमध्ये जनता दरबार घेण्याची गरज
गुरु न्यूज नेटवर्क, सिन्नर प्रतिनिधी : दि. 07 ऑक्टोंबर 2025 , www.gurunews.co.in
सिन्नर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री मा. माणिकरावजी कोकाटे यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी यांच्यावर पकड व प्रभुत्व नेहमी राहिले आहेत. मात्र सिन्नरचे प्रशासकीय अधिकारी आणि विशेषता महसूल अधिकारी मात्र याना तिळमात्र फरक पडलेला नाही. त्यामुळे सिन्नरमध्ये जनता दरबार घेण्याची गरज वाटते.
मा. माणिकरावजी कोकाटे राज्याचे कृषिमंत्री असल्याने त्यांच्या कामाचा ठसा नेहमीच राहिला आहे. त्यांच्या कामाची गती ही नेहमी आक्रमक पद्धतीने गाजलेली आहे. मात्र सिन्नर मध्ये काही दिवसात नगरपालिका निवडणूक होणार असून, त्या माध्यमातून जनतेची कामे काही प्रमाणात प्रशासकीय अधिकारी चिरीमिरी साठी अडकून ठेवत आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील काही अधिकारी चित्रीमिरी घेवून काम करायचे असे बोलले जायचे परंतु तसे नसुन, त्यांचा भाव मात्र पेटी, खोके याशिवाय ते बोलत नाही.
शेतकऱ्यांचे शेती निगडीत छोटे-मोठे काम प्रशासनासी येत असते. तसेच कामगार तलाठी कार्यालयात व सर्कल अधिकारी यांच्याशी नेहमी काम पडत असते परंतु सर्कल अधिकारी हे हेतू पुरस्कार केलेल्या नोंदी लावून धरत असतात. आणि त्याची असलेली दोन नंबरचे टेबलाखालून ची अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय ते सदर नोंद मंजूर करत नाहीत. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांचा भाव वाढत असून, त्यासाठी प्रत्येक अधिकारी यांचा स्वंतत्र कमिशन एजन्ट नेमलेला असतो. काही ठराविक अधिकारी सोडले तर बरेच अधिकारी पैशाशिवाय कामाची फाईल पुढे सरकत नाही. जमिनितील काही फेरफार असल्यास ते काम करताना किती फेऱ्या लागतील याचे मोजमाप नाही. आणि फेऱ्या मारूनही ते काम होईलच यांची शास्वती नाही. त्यासाठी कमिशन एजन्ट शिवाय पर्याय नाही. उर्वरित माहिती पुढील भागात…