सिन्नरमध्ये शतचंडी महायज्ञ सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

सिन्नरमध्ये शतचंडी महायज्ञ सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर : www.gurunews.co.in
श्री. महालक्ष्मी माता स्थापना दिनानिमित्त बुधवार दि. ८ ऑक्टोंबर २०२५ ते शनिवार दि. ११ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत शतचंडी महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला असुन, महालक्ष्मी मंदिर, लाल चौक, सिन्नर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शतचंडीचा आध्यात्मिक अर्थ
“दुर्गेच्या कृपेने असुरांवर विजय मिळवण्याची आणि आत्मशक्ती जागृत करण्याची साधना.” असते.
शतचंडी महायज्ञ हा एक अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि दुर्मीळ वेदिक यज्ञ आहे, जो दुर्गा सप्तशती (चंडी पाठ) मधील देवीच्या १०० पाठांसह संपन्न केला जातो. या यज्ञाद्वारे आदिशक्ती महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची आराधना केली जाते. हा यज्ञ दैवी शक्तींचे आवाहन, संकट निवारण, आरोग्य, संपन्नता, आणि शांती यासाठी केला जातो. हा यज्ञ नकारात्मक शक्तींवर विजय व संरक्षण देतो. जीवनातील अडथळे, रोग, आर्थिक संकटे व वैरी नाश होतो. मन:शांती, आत्मबल, आणि देवीकृपा प्राप्त होते. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक प्रगती होते. घरात किंवा संस्थेत शांती आणि सकारात्मक उर्जा वाढते. अशी या शतचंडी महायज्ञची आख्यायिका सांगितली जाते. व त्याचे अध्यात्मिक ग्रंथांमध्ये नमूद केल्याचे आढळते.
बुधवार दि. ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजेपासून सुरुवात होत असून, प्रधान संकल्प, मंडल देवता स्थापना अर्चन, अग्निमंथन, प्रधान हवन, मंडल देवता पुजन, दिपोत्सव व आरती करून या दिवसाची सांगता होईल.
तसेच गुरुवार दि. ९ ऑक्टोंबर २०२५ रोजी सप्तशती द्वारा विशेष अभिषेक पूजन, सप्तशती हवन, सप्तशती पाठ, दिपोत्सव व आरती गुणगौरव समारंभ होईल.
त्यानंतर शुक्रवार दि. १० ऑक्टोंबर २०२५ रोजी राजोपचार पूजन, प्रधान, अघोर हवन, कुमारीका पूजन, दिपोत्सव, आरती नंतर मान्यवरांचे सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम होऊन या दिवसाची सांगता होईल.
आणि शनिवार दि. ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रधान संकल्प, उत्तर पूजन, पूर्णाहूती, लघुरुद्र अभिषेक, शांतिपाठ, उत्सव महाआरती होईल.
*शतचंडी महायज्ञाचे मुख्य यजमान*
सौ. शोभा व श्री. दिलीपभाई दामोधर गुजराथी, विशेष सहकार्य – सौ. रुपाली व श्री. मंगेश गोपाळराव गुजराथी, नाशिक.
*प्रसादी भोजन प्रायोजक*
सौ. शिल्पा व श्री. मनिष रघुनाथ गुजराथी (सिन्नर), सौ. सायली व श्री. रोहन मधुकर गुजराथी ( पुणे), सौ. सेजल व श्री. ईशान मिलींद गुजराथी (सिन्नर), सौ. चित्रा व श्री. मिलींद गोपाळराव गुजराथी (सिन्नर), श्रीमती योगिता अविनाश पंडित ( सिन्नर), श्रीमती. मिनाक्षी सुरेश गुजराथी, (राजगुरुनगर) यांनी प्रसाद भोजनाचे योगदान दिले आहे.
श्री. महालक्ष्मी संस्थान, सिन्नर. अध्यक्ष – दिलीप दामोदर गुजराथी, उपाध्यक्ष – किशोर मधुकर गुजराथी, सचिव- रविंद्र रमाकांत गुजराथी, खजिनदार- सागर रणछोड गुजर, सहसचिव- सुरेश शांतीलाल गुजराथी, सर्वश्री विश्वस्त – मिलींद गोपाळराव गुजराथी, संजय प्रभाकर गुजराथी, संतोष रत्नाकर गुजराथी, महेंद्र शरदचंद्र गुजराथी, संदिप पद्माकर गुजराथी, सौ. शिल्पा मनिष गुजराथी व समस्त गुजराथी समाज, सिन्नर यांनी कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले.


