सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या तज्ञ संचालकपदी – राजेंद्र जगझाप

सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या तज्ञ संचालकपदी – राजेंद्र जगझाप
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, ता.१३ नोव्हेंबर 2025, www.gurunews.co.in
सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या तज्ञ संचालकपदी संत सावतामाळी पतसंस्थेचे राजेंद्र जगझाप यांची निवड करण्यात आली. येथील एसएसके धनलक्ष्मी पतसंस्थेच्या खडकपुरा शाखेत बुधवारी (ता.१२) रोजी झालेल्या सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत ही निवड एकमताने करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष संग्राम कातकाडे होते. संचालक मंडळाच्या विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर तज्ञ संचालक पदाच्या निवडीचा विषय घेण्यात आला. श्री. जगझाप यांच्या नावाची सूचना व्हाईस चेअरमन अरुण वारूंगसे यांनी आणली तर त्यास संचालक कांताराम माळी यांनी अनुमोदन दिले. यावेळी फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र अंकार, सचिव सौ. छाया राजेंद्र घोलप, संचालिका सौ. तेजश्री हेमंतराव वाजे, जनसंपर्क संचालक बाळासाहेब आव्हाड, संचालक मच्छिंद्र चिने, अनिल पवार, ईलाहीबक्ष शेख उपस्थित होते. राजेंद्र जगझाप यांची निवड होताच त्यांचा फेडरेशनचे अध्यक्ष संग्राम कातकडे, उपाध्यक्ष अरुण वारूंगसे व कार्याध्यक्ष राजेंद्र अंकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



