आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त १५ व १६ नोव्हेंबरला सहकार चषक क्रिकेट स्पर्धा

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त १५ व १६ नोव्हेंबरला सहकार चषक क्रिकेट स्पर्धा
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. १३ नोव्हेंबर २०२५, www.gurunews.co.in
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सिन्नर व सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन मर्या. सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील विविध पतसंस्था सहभागी होणार असून, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक येथील सन्माननीय फयाज मुलाणी यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नरचे सहाय्यक निबंधक मा. संजयजी गीते, श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन मा. नारायणशेठ वाजे, एस एस के स्कूलचे सरचिटणीस तथा एस एस के धनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक मा. कुणाल कातकाडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
क्रिकेटच्या स्पर्धा एस.एस.के. स्कुल, क्रिकेट अकॅडमी, जायगांव- ब्राम्हण वाडे रोड, जायगाव, ता. सिन्नर येथे होणार असून, दोन दिवस होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर चे सहाय्यक निबंध माननीय संजयजी गीते, आणि सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन मा. संग्राम कातकाडे, व्हा. चेअरमन मा. अरुणशेठ वारुंगसे, कार्याध्यक्ष मा. राजेंद्र अंकार, सचिव सौ. छाया राजेंद्र घोलप यांनी केले आहे.



