सहकार चषक भव्य क्रिकेट स्पर्धा सिन्नरमध्ये संपन्न !

सहकार चषक भव्य क्रिकेट स्पर्धा सिन्नरमध्ये संपन्न !
गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर | प्रतिनिधी, दि. १७ नोव्हेंबर २०२५, www.gurunews.co.in
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ मधील सहकार सप्ताह या निमित्ताने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर व सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार चषक भव्य क्रिकेट स्पर्धा अंतिम सामन्यासाठी सहकार विभाग नाशिक व श्रीमंत पेशवे पतसंस्था यांच्यात सामना झाला. सहकार विभाग संघाने १५३ धावा केल्या व श्रीमंत पतसंस्था संघाने ६० धावा केल्या. त्यामध्ये सहकार विभाग नाशिक संघ हा ९३ धावांनी जिंकून अंतिम विजेता ठरला तर श्रीमंत पेशवे पतसंस्था संघ उपविजेता ठरला.

दिनांक १५ व १६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एस एस के क्रिकेट अकॅडमी जायगाव ता. सिन्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा उपनिबंधक माननीय श्री. फयाज मुलानी, सहाय्यक निबंधक माननीय संजयजी गीते, एस एस के धनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन व सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. संग्राम कातकाडे तसेच एस एस के क्रिकेट अकॅडमी श्री. कुणाल कातकाडे, व सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र अंकार, संचालक अनिल पवार, सौ. छाया राजेंद्र घोलप, कांताराम माळी, महेश कुटे, निमिष लाले, मधुकर कोकाटे, अविनाश कांडेकर उपस्थित होते. तसेच खेळाडूंना काही इजा झाल्यास प्रथम उपचार करण्यासाठी डॉ. राजेंद्र कमानकर, आणि नितीन खरनार हजर होते.

सहकार चषक स्पर्धेमध्ये सिन्नर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे संचालक व कर्मचारी यांचे सात संघानी सहभाग नोंदवत नाशिक येथील सहकार विभागाने भाग घेतला असून, श्रीमंत पेशवे पतसंस्था, सोनांबे पंचक्रोशी, एस एस के धनलक्ष्मी नायगाव, लोकनेते शंकरराव वाजे, श्रीलेखा पतसंस्था व इतर संस्था, वावी पंचक्रोशी संघ, सिन्नर पंचमुखी संघ व नाशिक सहकार विभाग यांचा एक संघ असे आठ संघ सहभागी झाले होते. त्यात कस्तुरी पतसंस्था, संत सेना पतसंस्था, संचित पतसंस्था, गोवर्धन पतसंस्था, देवनदी खोरे पतसंस्था, ब्रह्मानंद पतसंस्था, माधवनाथ पतसंस्था, सेल्फ हेल्फ ग्रुप, महिला पतसंस्था, व्हिजन महिला पतसंस्था आणि इतर पतसंस्था यांनी भाग घेतला होता.

दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आठ संघाचे अ व ब गट करून एका गटात चार संघ असे दोन गट करण्यात आले होते. त्यांच्या प्रत्येकी एक सामना होऊन, सहकार विभाग नाशिक, वावी पंचक्रोशी संघ, सोनांबे पंचक्रोशी संघ व श्रीमंत पेशवे पतसंस्था संघ हे चार संघ सेमी फायनल मध्ये समाविष्ट झाले. सेमी फायनल मधून सहकार विभाग नाशिक व श्रीमंत पतसंस्था संघ हे दोन संघ अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आले. दि. १५ रोजी एकूण पाच सामने घेण्यात आले व दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सेमी फायनल चा एक सामना व फायनल चा सामना घेण्यात आला.
तसेच विजेता व उपविजेता असे सहकार चषक देण्यात आले. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूस सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. तर संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या श्री. सानप साहेब सहकार विभाग संघ यांना मालीकावीर घोषित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून सहकार विभाग नाशिकचे श्री. वैभव पुरे यांना घोषित करण्यात आले. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे सचिन चव्हाणके यांना घोषित करण्यात आले. अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार भानुदास करके सहकार विभाग नाशिक यांना देण्यात आला. हे सर्व पुरस्कार माननीय जिल्हा उपनिबंधक श्री. फयाज मुलाणी साहेब व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर श्री. संजयजी गीते साहेब तसेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. नारायणशेठ वाजे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच सामन्यांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले.
सदर सामन्यांचे समालोचन सहाय्यक निबंध सिन्नर श्री. संजयजी गीते साहेब व कस्तुरी पतसंस्थेचे व्यवस्थापक निमिष लाले यांनी केले.
सहाय्यक निबंधक सिन्नर माननीय श्री. गीते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोअर कमिटी सदस्य सहकार अधिकारी सर्वश्री. किशोर भालेराव, नवनाथ गडाख, महेश कुटे, कांताराम माळी, सुनील भाबड, विलास केदार, अविनाश कांडेकर, मधुकर कोकाटे, राजू घोलप व निमिष लाले यांनी उत्कृष्ट नियोजन केले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व सामने पार पडले .
एस एस के धनलक्ष्मी पतसंस्था नायगाव व एस एस के क्रिकेट अकॅडमी नायगाव यांनी उत्कृष्ट मैदान उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर अंपायर व ग्राउंड स्टाफ यांनी नियोजन केले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या साखळी सामन्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सहकार विभाग नाशिक ही टीम सातत्याने आघाडीवर राहिली व या टीम मध्ये सर्व सहकारातील अधिकारी वर्ग सहभागी होते. व या टीमचे नेतृत्व माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक श्री. फयाज मुलाणी साहेब हे स्वतः करत होते. ते उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. ते दोनही दिवस सर्व खेळाडूंबरोबर मैदानात अत्यंत साधेपणाने वावरत होते. हे त्यांचे मोठेपण. उच्चपदस्थ अधिकारी असूनही सर्वांसोबत मिळून मिसळून वावरणे हे विशेष होते. सिन्नरचे सहाय्यक निबंध श्री. संजयजी गीते साहेब व सहकार कार्यालय सिन्नर मधील सर्व अधिकारी वर्ग दोन्ही दिवस सर्वांसोबत उपस्थित होते. नाशिक सहकार विभाग संघातील सर्व अधिकारी त्यामध्ये दिंडोरीचे सहाय्यक निबंध श्री. वैभव मोराळे साहेब उपस्थित होते. सर्व अधिकारी मिळून मिसळून खेळात सहभागी झाले. अधिकार पदाचा कोणताही अविर्भाव नव्हता हे या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
हे क्रिकेट सामने सहकार अधिकारी व सहकारी संस्थांचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांसाठी एक वेगळे नाते निर्माण करणारे ठरले. ही एकजूट सहकाराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकते. हा संदेश नाशिक विभागातील सहकारात व पूर्ण महाराष्ट्रातील सहकारात जाईल याबद्दल शंका नाही. माननीय श्री. संजयजी गीते साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर, यांच्या संकल्पनेतून हे सामने घेण्यात आले. व त्यासाठी माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक श्री. फयाज मुलाणी साहेब यांचा सकारात्मक दृष्टिकोन व बहुमूल्य मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले आहे. सहकाराच्या इतिहासात याची नक्कीच नोंद घेतली जाईल.
जय सहकार.



