ओल्ड मॅन इन वाॅर… शरदचंद्र पवार

ओल्ड मॅन इन वाॅर… शरदचंद्र पवार
गुरू न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
काल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी आयोजित शरद पवार साहेबांच्या सभेसाठी गेलो होतो.
सभेत पुर्वी वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला..सभा होते की नाही..अशी परिस्थिती होती..आणि काहीशी गेल्या निवडणुकीतील साताऱ्यातील पावसातील ऐतिहासिक सभेची आठवण मनाला स्पर्शून गेली.
उद्याच्या लोकसभेतील निवडणुक निकाल काहीही लागो.. पण दिंडोरीतील पवारांची सभेतील गर्दी पाहिल्यावर महाराष्ट्रातील सर्व मातब्बर घराणी सत्तेच्या वळचणीला लागलेली असताना शरद पवार नावाचा ८४ वर्षाचा म्हातारा शेलार मामाच्या तडफेने लढत आहे..याची महाराष्ट्रातील राजकीय इतिहासात नोंद घ्यावी लागेल.
दिंडोरी आणि नाशिक मधील
महाविकास आघाडीतील अभुतपुर्व परिस्थिती पाहिल्यावर सत्ताधारी भाजपच्या विरोधात जो असंतोष खदखदत आहे..तो संघटीत करण्यात पवारांना यश येतंय..
महाराष्ट्रातील आणि विशेषतः नाशिक आणि दिंडोरी चा सामना खुप विषम आहे..याची जाणीव सर्वांना आहेत..एका बाजुला बेसुमार पैसा आणि संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला पराकोटीची निष्टा आणि आर्थिक चणचण या संकटातून साथ देणारे निष्ठावान मावळे असे या निवडणुकीचे चित्र आहेत..
महाराष्ट्रातील अनेक नेते सत्तेचा गुलकंद चघळण्यासाठी मोदी – शाह यां जोडीसमोर नुसतेच वाकलेले नाही तर लोटांगण घालतांना दिसताय..पण पवारांचा महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक व दिंडोरीमधील जलवा पहाता पवार पुन्हा एकदा नव्या पिढीचे हिरो बनताहेत.हे सत्य मात्र नाकारता येत नाही..
आणि ही निकराची लढाई पहाता हि लढाई त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील उत्कर्ष बिंदू ठरेल..हे मात्र नक्की. थोडक्यात….आत्मविश्वास गमावलेल्या नाशिक व दिंडोरी तील जमीनीवरील आढावा घेतला तर भाजप आघाडीतील महायुतीतील ऊमेदवारांचा निभाव लागणे एकुणच कठीण आहे.
— नामदेवराव कोतवाल.
सिन्नर.