आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त रक्तदान शिबीर सिन्नर मध्ये संपन्न

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त रक्तदान शिबीर सिन्नर मध्ये संपन्न
गुरु न्यूज नेटवर्क : सिन्नर, www.gurunews.co.in
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर विभाग, व सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व सिन्नर मध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी सहाय्यक निबंधक मा. संजय गिते यांच्या प्रयत्नातून सदर शिबीर यशस्वी झाले.
या शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढींच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला दात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेच्या हॉलमध्ये हे शिबिर घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक संजय गीते, फेडरेशन जिल्हा कार्याध्यक्ष मा. नारायणशेठ वाजे, तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. संग्राम कातकाडे, उपाध्यक्ष मा. अरुणशेठ वारुंगसे, कार्याध्यक्ष मा. राजेंद्र अंकार, जनसंपर्क संचालक मा.बाळासाहेब आव्हाड, सर्वश्री. संचालक मच्छिंद्र चीने, अनिल पवार, कांताराम माळी, भाऊसाहेब पवार,अनिल पवार, सचिव राजेंद्र घोलप उपस्थित होते.
यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष संग्राम कातकडे, संचालक कांताराम माळी, भाऊसाहेब पवार, सहाय्यक निबंधक अधिकारी नवनाथ गडाख, श्रीमंत पतसंस्था कार्यकारी संचालक महेश कुटे, तालुका ऑडिटर झगडे, डॉ. राजेंद्र कमानकर व संचालक मंडळाने रक्तदान केले. शिबीरासाठी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. हेमंत बागुल, साईनाथ शेलार, वैष्णवी जाधव, अविनाश जाधव, वाल्मीक वाळुंज, यांनी सहकार्य केले. तसेच सहकार अधिकारी किशोर भालेराव, सुदर्शन तांदळे, श्रीमंत पतसंस्था कार्यकारी व्यवस्थापक आयुब शेख यांनी सहकार्य केले.