वयोवृद्ध व्यक्तीना मोफत उपचार!

वयोवृद्ध व्यक्तीना मोफत उपचार !
लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि सिद्धिविनायक हॅास्पिटलचा उपक्रम
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. ०९ सप्टेंबर २०२५
लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि सिद्धिविनायक हॅास्पिटल, सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने, वय वर्षे ७० किंवा त्या पुढील सर्व व्यक्तींना, वयवंदना कार्डचे मोफत वाटप करण्यात येणार असून, सदर योजनेचा वयोवृद्ध व्यक्तीना मोफत उपचाराचा लाभ मिळू शकतो.
वय वर्ष ७० किंवा त्यापुढील सर्व वयस्कर व्यक्तींसाठी “वयवंदना कार्ड” आयुष्मान भारत योजनेच्या मिशन मधून साकार करण्यात येत आहे. सदरील कार्डद्वारे ७० वर्ष किंवा त्यापुढील वयस्कर व्यक्तींसाठी महाराष्ट्रात १३५६ आजारांवर व महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात १९६१ आजारांवर मोफत उपचार केला जातो. एका व्यक्तीसाठी पाच लाख रुपये पर्यंतचे आजारांवर मोफत उपचार होऊ शकतो. यात ‘खुभा प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण‘ यासारखे गंभीर आजारांवर देखील मोफत उपचार केले जातात. सदरील कार्ड हे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या कोणत्याही रुग्णालयात मोफत काढता येऊ शकते.
*कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे:*
१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर जो आधार कार्ड ला लिंक असेल तो आवश्यक.
3) एक पासपोर्ट फोटो.
*दि. 13/09/2025. *वार : शनिवार
*वेळ: सकाळी 09:30 ते दुपारी 02 वाजे पर्यंत.
*ठिकाण : लायन्स हॅाल, रामनगरी, देवी रोड, सिन्नर.*
नाव नोंदणीसाठी संपर्क:
*डॉ. प्रशांत गाढे : 9420002132
*डॉ. दिलीप गुरुळे : 8888669050
लायन्स क्लबचे अध्यक्ष : मा. श्री. बबन वाजे, लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष : मा. श्री. हेमंत वाजे, सचिव : मा. श्री. जयवंत काळे, खजिनदार : मा. श्री. प्रशांत शिंदे प्रकल्प प्रमुख : डॉ. प्रशांत गाढे यांनी या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.