राजेंद्र आंबेकर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ

राजेंद्र आंबेकर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नर नगरपरिषदेमध्ये गेल्या पस्तीस वर्ष प्रदीर्घ सेवा करून वयोमानाने सेवानिवृत्त होत असलेले मा. श्री. राजेंद्र नामदेव आंबेकर यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ शनिवार दि: 5 जून 2025 रोजी दुपारी 4:00 वाजता, ज्वालामाता लॉन्स शिर्डी रोड, सिन्नर येथे संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे, प्रमुख अतिथी माननीय श्री. उदयभाऊ सांगळे, सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. श्री. रितेश रामदास बैरागी, सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदेवराव लोंढे, सेक्रेटरी – नामदेवराव लोणारे तसेच स. वि. प्र. शि. संस्था माजी अध्यक्ष मा. चंद्रकांत वरंदळ मा. सेक्रेटरी श्री. विष्णुपंत बलक आणि श्री. दशरथ लोंढे यांची उपस्थिती प्रार्थनीय असणार आहेत.
मा. राजेंद्र आंबेकर यांनी सिन्नर नगरपरिषदे मध्ये काम करत असताना सिन्नर वाशियांशी नेहमी आदर पूर्वक विचारपूस करून त्यांच्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहेत. आत्ताच्या काळात तर ठराविक चार पाच लोक सोडले तर स्थानिक कर्मचारी राहिले नाही. सर्व सिन्नर तालुक्याच्या बाहेरील कर्मचारी दिसत आहे. त्यामुळे तुमच्या कामाला वारंवार चकरा मारल्या शिवाय पर्याय नसणार आहे. स्थानिक लोक नेहमी स्थानिक नागरिकांना जलद सेवा देऊन आपले असलेले नाते जपत आले आहेत.
या कार्यक्रमाकरिता उपस्तित राहण्यासाठी सर्वश्री. अरुण निवृत्ती आंबेकर, सूर्यकांत नामदेव आंबेकर, चंद्रशेखर निवृत्ती आंबेकर, अक्षय अरुण आंबेकर, संकेत सूर्यकांत आंबेकर, प्रतीक राजेंद्र आंबेकर, सिद्धेश चंद्रशेखर आंबेकर व समस्त आंबेकर परिवार यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.