सहकारातील बदलते धोरण व त्याबाबतची तत्परता विषयी कार्यशाळा

सहकारातील बदलते धोरण व त्याबाबतची तत्परता विषयी कार्यशाळा
सिन्नर मध्ये प्रथमच अनुभवी व्याखेते
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क :
सहकार धोरणात होणारे बदल व पतसंस्थांचे भविष्यातील धोरण आणि त्यातील शंका समाधान या विषायासह अनेक मनातील भेडसवणारे प्रश्न यावर आपले मत व्यक्त करण्याची संधी या कार्यशाळेतून परिपूर्ण होईल अशी अपेक्षा सर्वांना आहेच, आणि ती पूर्ण होईल हा हेतू साध्य करण्यासाठी सिन्नर मध्ये प्रथमच अनुभवी आणि तज्ञ विचारवंत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सदर कार्यशाळेसाठी मा. श्री. माणिकराव कोकाटे (आमदार -सिन्नर विधानसभा)
मा. आ. श्री. राजाभाऊ वाजे, (माजी आमदार सिन्नर, विधानसभा) मा. श्री. भास्कर बांगर साहेब (सह सचिव, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन) मा. अॅड. अंजलीताई पाटील (संचालीका, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन) मा. श्री. नामकर्ण आवारे (अध्यक्ष- स्टाईस, सिन्नर) मा. श्री. गणेशजी निमकर (बँकींग तज्ञ), श्री. समिर ओतुरकर ( व्यवस्थापक गो डिजीट जनरल इन्शुरन्स कं.)
मा.श्री. मिर्झा गालीब (सनदी लेखापाल), मा. श्री. योगेश उपासणी (सचिव – सहकार भारती, अहमदनगर), मा. अॅड. नवनाथ जगताप (विभागीय अधिकारी बारामती बँक), मा. श्री. मिलींदजी काळे (अध्यक्ष-कॉसमॉस बँक), मा. श्री. मसुद अत्तार (व्हा. प्रेसीडेंट, नेटविन सिस्टीम्स अॅण्ड सॉफ्टवेअर इं. प्रा.ली.), मा. श्री. अशोक देशमुख (हास्य सम्राट) आणि कार्यक्रमाचे स्वागतत्सुक
मा. श्री. नारायणशेठ वाजे (उपकार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मुंबई) उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वीही अनेकदा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यातून बरेच काही शिकलो, मात्र सहकार धोरणात होणारे वारंवार बदलानुसार आपणास कार्य तत्पर राहणे गरजेचे आहे.
सहकार प्रशिक्षण घेऊन फक्त लेखा परीक्षण मध्ये गुण मिळवणे हा हेतू मनात ठेऊन कार्यशाळा घेणे महत्वाचे नसून, पतसंस्था मध्ये काम करत असताना कार्यतत्परता दाखविण्यासाठी त्याचा फायदा होईल, या हेतूने सहकार प्रशिक्षण आयोजित केले असून, तो हेतू साध्य करण्यासाठी आयोजकांची खऱ्या अर्थाने तळमळ आहे. या कार्यशाळेतून परिपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.
सदर कार्यशाळा शनिवार दिनांक २४/०२/२०२४ व २५/०२/२०२४ रोजी हॉटेल राजेश, सिन्नर संगमनेर हायवे, गोंदे फाटा येथे होणार आहे. ज्यांनी नाव नोदणी केली नसेल त्या सहकारी पतसंस्थानी आपले नाव श्री. महेश कुटे (93251 08703) आणि कांताराम माळी ( 9420691421) यांचेकडे करावी.
*कार्यक्रम रूपरेषा झूम करून पाहू शकता👇🏿👇🏿👇🏿👇🏿*