बंडूनाना भाबड यांच्या वाढदिवसानिमित्त पुरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..

बंडूनाना भाबड यांच्या वाढदिवसानिमित्त पुरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..
गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर दि. 28ऑक्टोंबर 2025 www.gurunews.co.in
महाराष्ट्रात अतिवृष्टीने अनेक कुटुंबे विस्थापित झाली असून, अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास हातभार लावूया. या कठीण प्रसंगी, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक मा. श्री. बंडूनाना भाबड यांच्या वाढदिवसानिमित्त हार, बुके, शाल, फेटा आणू नयेत. असे आवाहन श्री. बंडूनाना भाबड यांनी केले.
यापूर्वी श्री. बंडूनाना भाबड यांचे वाढदिवसाचे कार्यक्रम त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे करत विविध प्रकारचे उपक्रम राबवत, शाल, गुच्छ, पुष्पहार आणून वाढदिवस साजरा करत होते. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत आपल्याच शेतकरी बांधवांना जी मदत करता येईल. ती करण्याचा मानस श्री. भाबड यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवाराने यावर्षी कोणत्याही प्रकारचे शाल, हार, गुच्छ आणू नये. असे आवाहन श्री. बंडूनाना यांनी केले. आणि या त्या आवाहानाला त्यांच्या मित्रपरिवाराने साथ देत, लाखो रुपयांच्या मदतीची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. ती पूर्ण होईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.

त्याऐवजी, आपण आपल्या इच्छेनुसार स्वेच्छेने आर्थिक मदत करुन पूरग्रस्तांसाठी आधार बनू शकतो. त्यासाठी सोबत दिलेल्या स्कॅन द्वारे आर्थिक सहाय्य करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याची नम्र विनंती श्री. भाबड यांनी केली. सदर मदत निधी 30 आक्टोबर 2025 पर्यंतच जमा करावी. असे आवाहन बंडुनाना भाबड मित्र मंडळ परिवाराने केले आहे.

सन्माननीय बंडूनाना भाबड हे नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.नानांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या सहकाऱ्यांनी अनेक वर्षापासून विविध उपक्रमांनी विशेषतः, पाणी परिषद, रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर,नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, वृक्षारोपण, गुणवंत भूमिपुत्रांचा सत्कार, तपोवृध्दचा, गुरुजनांचा सत्कार अशा उपक्रमानीं साजरा करत. चालू वर्षी ओला दुष्काळ, पूर परिस्थिती, यामुळे हार, फेटे, शाली न घेता रोख स्वरूपात आपण वाढदिवसाच्या निमित्त, पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी उभारू या चला तर मग आपल्या स्वइच्छेने पुढील नंबर वर फोन पे, गुगल पे, द्वारे हार, गुच्छ ऐवजी अशी मदत करूया! आणि मा. श्री. बंडुनाना भाबड यांच्या या उपक्रमाला आपणही साथ देऊया!

सामान्यांना आर्थिक व सामाजिक मदत कशी करता येईल. यासाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात. त्याचाच भाग म्हणून आपल्या वाढदिवसावर खर्च करण्याऐवजी त्यातून होणारी बचत ही पूरग्रस्तातून विस्थापित झालेल्या समाज नागरिकांना जमेल तेवढी मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे तालुक्यातील व त्यांना मानणारा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्या माध्यमातून आजपर्यंत शंभरहून अधिक नागरिकांनी आपापल्या परीने निधी संकलन केले आहे. आज अखेर 80,000/- हून अधिक निधी जमा झाल्याचे श्री. भाबड यांनी गुरु न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.



