खरंच एकादशी करावी का ?

खरंच एकादशी करावी का ?
आपण वर्षानुवर्ष एकादशी करत आलो आहोत. एकादशी का करतो ? तर सगळे करतात म्हणून करतो. किंवा तेवढाच रोजच्या जेवणापासून वेगळं काहीतरी खायचं असतं म्हणून करतो.
काहींना खरच एकादशीचे महात्म्य माहीत असतं म्हणून करतात. खरतर आपल्या वेद आणि पुराणांनी आपल्याला इतकं भरभरून दिलं आहे की, त्याची कल्पनाही आपल्यातील बऱ्याच जणांना नाही आणि ते जाणून घेण्याची गरजही वाटली नाही. एकादशीचे महत्त्व पटवून देणारी पौराणिक कथा बऱ्याच वाचनात येतात. पण आजच्या पिढीला त्या पटत नाहीत. त्यांना सर्व बाबतीत शास्त्रीय आधार लागतो. आणि तो शास्त्रीय आधारही आहे. अध्यात्म नुसार फक्त महिन्यातून दोन वेळा एकादशीचा उपवास केला तरी सर्व उपवास केल्याचे पुण्य आपणास लाभते.
*एकादशी चे शास्त्रीय महत्व
पृथ्वीतलावर जी प्राणी मात्र जीवसृष्टी राहते, त्यांचे आयुष्य हे सूर्य आणि चंद्राच्या चक्रावर अवलंबून असते, म्हणूनच पौर्णिमेला आणि अमावस्येला समुद्राच्या लाटांचे प्रमाण हे जास्त असते. एवढ्या अथांग समुद्रावर चंद्राचा परिणाम दिसत असेल तर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही का? तर नक्कीच होतो.
त्या दिवशी माणसाच्या इमोशनल कॉलिटी ह्या मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होतात. म्हणजेच माणसाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी या दिवशी ऍक्टिव्ह होतात. पोर्णिमा अमावस्येला या क्वालिटी चांगल्या आणि सात्विक असतील तर मग सुंदरच. त्यासाठी एकादशीला चार दिवस आधी उपवास.. देवाजवळ वास …सांगितले आहे.
चार दिवस आधी यासाठी की उपवास केल्याने जो परिणाम आपल्या मेंदूवर होणार आहे. ते परिणाम व्हायला चार दिवस लागतात. थोडक्यात सात्विक उपवास केल्याने,
👉तुमचे पोट चांगले राहते,
👉शरीर हलके राहते,
👉मनाचा उत्साह वाढतो,
👉कामाचा उत्साह वाढतो,
👉त्यामुळे आपल्यातील सुप्त क्वालिटी जास्त ऍक्टिव्ह होतात. आणि
👉आपण आनंदी राहतो.
बघा किती सखोल विचार केला आहे.
*मग आता हा उपवास कसा करावा ?
माझ्यामते उपवास हे अध्यात्माकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण काय खातो कसे खातो हे तुम्हाला माहीत आहेच परिणामही माहित आहे.
उपवास …
*१)देवाच्या सानिध्यात राहून मंत्रोच्चार करावे, सात्विक गोष्टी ऐकाव्या, गीता वाचन करावं अगदीच काही जमलेच नाही तर गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा. देवाच्या सान्निध्यात राहिल्याने त्यातील जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते ती अफलातून असते .
*२)पोटाला आराम द्यावा कमीत कमी खावं आणि पचायला हलकं खावे.
अध्यात्मिक शास्त्रानुसार या दिवशी कुठलेही धान्य खाऊ नये कारण आपण म्हणू शकतो की धान्य पचायला जड असतात, त्याने लंघन होणार नाही, उपवास होणार नाही, धान्यामध्ये वॉटर रिटेन होण्याची प्रॉपर्टी जास्त असते. त्यामुळे विषाक्त पदार्थ बाहेर जात नाहीत म्हणून पोटाला आराम द्यायचा असेल तर मग त्या त्या ऋतूत येणारी फळे खावीत, दूध, ताक, फळांचे रस असे पचायला हलके पदार्थ खाण्यात असावेत.
*यातही मी आयुर्वेदाची डॉक्टर असल्याने सांगेल की, ज्यांना पचनाचे विकार आहेत त्यांनी भरपेट फळे खाऊ नये
👉जे लोक खूप व्यायाम करतात त्यांनीच फळे खायला हरकत नाही.
👉असे सात्विक अन्न खाल्ल्याने आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ निघायला मदत होते.
👉परिणामी आपल्याला हलके वाटते.
👉आपला उत्साह वाढतो. म्हणजेच आपला ब्रेन ही ॲक्टिव राहतो.
*यालाच म्हणतात “Gut brain relation”
👉आहार सात्विक आणि पचायला हलका घेतला की आपल्या इमोशनल क्वालिटीतील सात्त्विकता वाढते तेच जर मांसाहार आणि तामसी आहार खाल्ला तर आपल्यातील तामसी क्वालिटी वाढतील.
👉थोडक्यात सगळेच उपवास केल्याने आपल्या शरीर आणि मनाची “Natural healing process”वाढते.
*त्याने आपल्याला अध्यात्माकडे जायला सोपे होते.
अरे ..पण आम्हाला आता अध्यात्माकडे जायचेच नाहीये . इथेच सगळी गोची होते.
आता एवढेच सांगेल की….. अध्यात्म (spirituality) म्हणजे “To hight our spirit”.
*आपल्यातले चांगले गुण ओळखून त्यांना वाढवणे म्हणजे अध्यात्म. एवढं समजून घेतलं तरी पुरेसा आहे. इथे पर्यंत तर ठीक आहे पण एवढे कमी खाऊन कसं चालेल?
*आम्हाला त्रास होतो.. उपवासाने राहवत नाही, डोकं दुखतं इत्यादी सुरुवातीला असा त्रास होऊ शकतो कारण.
१)उपवासाची सवय नसणे
२) तुमच्या शरीरातील विषाक्त पदार्थांमुळे
३) तिसरं तुमच्या भक्तीचा अभाव असल्यामुळे
*म्हणजेच उपवास जर मनापासून आणि भक्ती भावाने केला तर त्रास होणार नाही.*
💊💊🩺💉 *काही व्याधीग्रस्त किंवा औषधे चालू असताना कसे करायचे ?*
तर 👩⚕️👩⚕️ *माझ्यासारख्या आयुर्वेद डॉक्टरला कन्सल्ट करूनच उपवास करावा.* आणि मनापासून करावा.
“जो देतो तो देव ”
मग या निसर्गाने आपल्याला जे दिले ते देवच नाही का ?त्याचे आभार मानण्यासाठी त्याची मनापासून भक्ती केली की आपला उपवास सफल झालाच.
*शेवटी काय तर आपले उपवास,व्रतवैकल्ये हे फक्त मानवाच्या कल्याणासाठी आहे. फक्त ते योग्य पद्धतीने आणि अगदी मनापासून केले पाहिजे.
हरे कृष्णा
*डॉ.अनघा दिघे, पुणे
9665992792