आनंदा निऱ्हाळी यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा !

आनंदा निऱ्हाळी यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा !
गुरु न्युज नेटवर्क | दि. ०६/१०/२०२३
सिन्नरच्या मातृभूमीत जन्मलेल्या ध्येयनिष्ठ, कष्टाळू आणि अतिप्रामाणिक व्यक्तीमत्व असलेले लाडके दादा म्हणजे सन्माननिय श्री. आनंदा आबाजी निऱ्हाळी यांचा शनिवार दि. ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी “सहस्र चंद्रदर्शन सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्या बाबतची संकल्पना त्यांचे पुत्र नंदकिशोर निऱ्हाळी कर सल्लागार व धनंजय निऱ्हाळी आणि मुलगी रेखा यांनी मांडली व त्यास मित्रपरिवाराने या कार्यक्रमाची धामधूम सुरू केली.
मा. आनंदराव निऱ्हाळी वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करत असताना देखील अतिशय सुदृढ शरीरबांधा आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी परमेश्वराकडून देणगी प्राप्त झाली म्हटले तर वावगे होणार नाही. आनंदराव यांची आई ते ३ वर्षाचे असताना मरण पावल्या. लक्ष्मीबाई असलेल्या आईने आपल्या मुलाचे संगोपन करण्याचा योग त्याना आला नसला तरी साक्षात लक्ष्मी रुपाने दिवसे दिवस प्रगती पथावर नेण्यासाठी त्यांचा आशिर्वाद आज पर्यंत त्यांच्या पाठीशी असल्याने मुलांबरोबर नातू ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आनंदरावांचे वडील सिन्नर नगरीत पोथीवाले बाबा म्हणून नावारूपाला आले होते. प्रत्येक विडी कारखाण्यात ग्रंथाचे वाचन करून त्याचा मराठीत समजेल असा भावार्थ सांगण्याची ईश्वर देणगी त्यांना प्राप्त होती. अशा या धार्मिक परिवारात वाढलेले संस्कारमय आनंदरावाचा “सहस्र चंद्रदर्शन सोहळ्या” निमित्त त्यांच्या परिवाराला आनंदाचे वातरण तयार झाले आहेत.
आनंदरावांची पत्नी कै. लिलावती यांनी संसाराची साथ वयाच्या ४९ व्या वर्षी सोडली. त्यामुळे आनंदरावाना प्रथम मातृमाया, वडिलांचे प्रेम फार कमी मिळाले. त्यानंतर पत्नीनेही साथ सोडल्याने एकटेपणाने जिवण जगत असताना स्वतःला कामात व्यस्त ठेवून मुलांचा आणि मुलीचे शिक्षणात कमी पडायचे नाही. त्यांना शिक्षण देत असताना किराणा दुकानात हमाली करत कुटुबाला सावरण्याचे काम त्यांनी केले. सिन्नर परिसरात त्यांच्या वयापासून ते अगदी त्यांच्या नातवंडे यांच्या वयातील मुलांशी त्याची मैत्री सर्वश्रुत आहे.
आनंदरावाचे स्वतःचे शिक्षण जुनी १० वी, ब. ना. सारडा विद्यालयातून पूर्ण केली. गिरणी कामगार म्हणून त्यांनी मुंबई येथे काम केले. परंतु गिरणी उद्योग बंद पडल्याने सिन्नर येथे हमाली केल्याशिवाय त्याकाळात दुसरा पर्याय त्याना नव्हता, हे करत असताना नंदकिशोर या मुलाला कर सल्लागार म्हणून नावारूपाला आणण्याचे श्रेय त्यांचेच आहे. तर दुसरा मुलगा धनंजय हा पण एका नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे. अगदी प्रतिकुल परिस्थितीत चांगल्या प्रकारचे मुलांना शिक्षण देवून संस्कार केले. त्याच बरोबर कै, लिलावती या माईने चांगली साथ दिली. हे सर्व एैश्वर्य पाहण्यास ती जरी आज नसली तरी तिच्या आशिर्वादाचे फळच आम्हाला मिळत असल्याचे नंदकिशोर निऱ्हाळी यानी यावेळी आपले मत व्यक्त केले. निऱ्हाळी यांचे मामा सुरेश गंगाधर कुरडे व दत्तायेय गंगाधर कुरडे (मंचर) यानी अडचणीच्या काळात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन आम्हाला सहकार्य केले. त्यांचे रुण कधीही विसरता येणार नसल्याचे नंदकिशोर निऱ्हाळी यांनी सांगीतले.