सहकार आयुक्तपदी दिपक तावरे

सहकार आयुक्तपदी दिपक तावरे
नाशिक | गुरू न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
पुणे : राज्याच्या सहकार आयुक्तपदी सन्माननीय दीपक रामचंद्र तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा. तावरे यांची सहकार विभागात जिल्हा उपनिबंधक म्हणून शासकीय कारकीर्द सुरू झाली. लातूर येथे जिल्हा उपनिबंधक, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
सहकार विभागात विभागीय निबंधक असताना त्यांची आयएएस पदी नियुक्ती झाली होती. यानंतर पणन संचालक, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक, राज्य कामगार विमा योजना आयुक्त आणि यशदाचे उपमहासंचालक आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांनी सोमवारी दि. २७ मे २०२४ रोजी सायंकाळी पदभार स्विकारला असून, मा. शैलेश कोतमिरे यांनी त्यांचे स्वागत करून पदभार देण्यात आला.
सहकार क्षेत्राला उंचीवर नेऊन, सक्षम अधिकारी म्हणून त्यांच्या यापूर्वीच्या कामाचा अनुभव निच्छितपणे योगदान देईल अशा सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी व्यक्त केली.